सातपूरला खड्ड्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:09 AM2019-08-19T01:09:11+5:302019-08-19T01:09:44+5:30

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यात वृक्षारोपण करून सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. परिसरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित न बुजविल्यास सर्वच प्रभागात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Planting trees in a pit in Satpur | सातपूरला खड्ड्यात वृक्षारोपण

सातपूर विभागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून मनपाचे लक्ष वेधण्यासाठी निषेध आंदोलन करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे. समवेत अपूर्व हिरे, जीवन रायते, मधुकर मौले आदीसह कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देमनपाविरोधात आंदोलन : राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी

सातपूर : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यात वृक्षारोपण करून सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. परिसरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित न बुजविल्यास सर्वच प्रभागात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. सातपूर विभागात पाच प्रभाग असून, असा एकही प्रभाग असा नाही की, तेथे खड्डे नाहीत. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी पक्ष सातपूर विभागाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात सातपूर शहर अध्यक्ष जीवन रायते, मधुकर मौले, समाधान तिवडे, दत्ताजी वामन, नीलेश भंदुरे, ऋ षिराज खरोटे, अरु ण भोसले, तुषार दिवे, संदीप पवार, महेश आहेर, राहुल बैरागी, धनंजय रहाणे, जीवन बेंडकुळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Planting trees in a pit in Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.