शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नाशकात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे राेपण, हजारो उपासकांच्या उपस्थितीत सोहळा

By suyog.joshi | Updated: October 24, 2023 16:50 IST

ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नाशिक -  ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पालखीत मिरवणूक काढल्यानंतर त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात विजयादशमीदिनी महाबोधीवृक्षाचे रोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा क्षण ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील हजारो बुद्ध उपासक तसेच देश-विदेशातील भिख्खू उपस्थित होते. विजयादशमी अर्थात मंगळवार, दि. २४ रोजी पांडवलेणीजवळ त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेरो यांच्या हस्ते या ऐतिहासिक महाबोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, श्रीलंकेचे सांस्कृतिक मंत्री विदूर विक्रम नायक, श्रीलंकेतील भिक्खू नाराणपणावे, भिक्खू पोंचाय, भदंत खेमधम्मो महस्थवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्य शासनाने १८ कोटींचा तातडीने निधी देत या कामात सिंहाचा वाटा उचलला. हा बोधीवृक्ष श्रीलंकेतून आणला असून ही एक प्रकारे महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. ज्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, त्याच झाडाचे नाशिकमध्ये रोपण होत आहे, ही कौतुकाची बाब आहे. विदूर विक्रम नायक म्हणाले, या देशात फक्त एकच भाषा आहे, ती आहे हद्याच. प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमानेच वागले पाहिजे. एकमेकातील कटूता दूर व्हायला हवी. ऐतिहासिक बोधी वृक्ष म्हणजे हा मानवतेचा संदेश देणाो असून बुद्धांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे, त्याचे प्रत्येकाने अवलोकन करणे गरजेचे आहे.मंत्रोच्चारात कार्यक्रमबौद्ध भिखू महासंघाच्यावतीने बुद्ध उपासना व मंत्रोच्चारात महाबोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित भिखूंनी या झाडाला माती अर्पण केली. त्यानंतर इतर मान्यवरांनी झाडाला पाणी घातले. कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण, ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संदेशकार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांनी ऑनलाईन व्हिडिओद्वारे उपासकांना संदेश दिला. भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यत पाेहोचविण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे समता, बंधुता, शांतता पाळणारी, मुल्ये जाेपासणारे राज्य आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी शांतीची उजळणी करण्याचा सल्ला शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Nashikनाशिक