आईच्या वयाइतके ७१ कडूलिंब वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 12:23 AM2021-05-16T00:23:24+5:302021-05-16T00:25:53+5:30

सुरगाणा : तालुक्यातील सालभोये येथे जिल्हा परिषद शिक्षकाने आईच्या स्मृती जपण्यासाठी आईच्या वया इतकेच म्हणजे ७१ कडूलिंब वृक्षांचे रोपण केले.

Planting of 71 neem trees up to mother's age | आईच्या वयाइतके ७१ कडूलिंब वृक्षांचे रोपण

सालभोये येथे कडुलिंब झाडांची लागवड करतांना शिक्षक विनायक भोये, पुंडलिक माळी.

Next
ठळक मुद्देझाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला

सुरगाणा : तालुक्यातील सालभोये येथे जिल्हा परिषद शिक्षकाने आईच्या स्मृती जपण्यासाठी आईच्या वया इतकेच म्हणजे ७१ कडूलिंब वृक्षांचे रोपण केले.

सात नद्यांचे उगमस्थान असलेल्या केम पर्वत कुशीत उंचावर असलेल्या सालभोये या गावाला दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. याच गावातील मात्र सुरगाणा येथे वास्तव्यास असलेले शिक्षक विनायक भोये यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले.
कोरोनाचा काळ असल्याने उत्तर कार्यात नातेवाईकांनी गर्दी करु नये. तसेच कोरोनाचा प्रार्दुभाव गावात होऊ नये यासाठी खबरदारी घेत नियमांचे पालन करत अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आईच्या उत्तर कार्याचा विधी पार पाडला. यावेळी आईच्या स्मृतिचा वसा जपण्यासाठी त्यांनी वृक्षारोपण व संवर्धनाची प्रथा गावात सुरू केली आहे. आईचे वय तितक्याच प्रमाणात ७१ कडुलिंबाची झाडे स्मशानभूमीत तसेच दशक्रिया विधीच्या ठिकाणी आणि लगतच्या शेतात लावण्यात आली.

गावातील ज्या कुटूंबात अशा मृत्यूच्या घटना घडतील त्या कुटुंबाने आपल्या घरातील व्यक्तींच्या आठवणी जपण्यासाठी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकामी विनायक भोये यांना त्यांचे सहकारी पुंडलिक माळी, शिक्षक नामदेव जोपळे यांचे सहकार्य लाभले आहे. या निर्णयाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

Web Title: Planting of 71 neem trees up to mother's age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app