वाखारी गावात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:20 IST2021-06-06T23:47:18+5:302021-06-07T00:20:28+5:30

लोहोणेर : वाखारी गावात शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने वृक्ष रोपण करण्यात आले.

Plantation in Wakhari village | वाखारी गावात वृक्षारोपण

वाखारी गावात वृक्षारोपण

ठळक मुद्देवाखारीचे ग्रामस्थ उपस्थित होते

लोहोणेर : वाखारी गावात शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने वृक्ष रोपण करण्यात आले.

या वर्षी करोना साथीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू ऑक्सिजन अभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी वाखारी गावात एक निसर्गरम्य वातावरण तयार व्हावे म्हणून प्रथमता जेसीबीच्या सह्याने त्या ठिकाणची पूर्णपणे जागा साफ करण्यात आली. व त्यानंतर खड्डे खोदून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येवून प्रत्येक झाडाभोवती लोखंडी जाळी लावण्यात आल्या. संपूर्ण झाडांना पाणी टाकण्याची जबाबदारी सोबविण्यात आली.
याकरीता श्याम पवार, शिवा जाधव, रवी गुंजाळ आदी परीश्रम घेत आहेत. याप्रसंगी वाखारीचे ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Plantation in Wakhari village