उभराणेच्या शनिमंदिर परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 03:36 PM2021-07-11T15:36:10+5:302021-07-11T15:36:51+5:30

उमराणे : येथील जाणता राजा मित्र मंडळातर्फे महाराणी ह्यसईबाई शिवाजीराजे भोसलेह्ण यांचे स्मरणार्थ राहूड घाटाजवळील प्राचीन शनिमंदिर परिसरात वटवृक्ष लागवडीचा उपक्रम नुकताच संपन्न झाला.

Plantation in the Shanimandir area of Ubharane | उभराणेच्या शनिमंदिर परिसरात वृक्षारोपण

राहूड घाटाजवळील प्राचीन शनिमंदिर परिसरात वटवृक्ष लागवड करताना जाणता राजा मंडळाचे कार्यकर्ते.

googlenewsNext
ठळक मुद्दे२७ वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात विविध उपक्रम अखंडपणे राबविले जात आहेत.

उमराणे : येथील जाणता राजा मित्र मंडळातर्फे महाराणी ह्यसईबाई शिवाजीराजे भोसलेह्ण यांचे स्मरणार्थ राहूड घाटाजवळील प्राचीन शनिमंदिर परिसरात वटवृक्ष लागवडीचा उपक्रम नुकताच संपन्न झाला.
मंडळाच्या वतीने उमराणे परिसरात गेल्या २७ वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात विविध उपक्रम अखंडपणे राबविले जात आहेत. त्यातील वृक्षारोपण उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड करून संगोपन केले जात आहे. त्यातीलच हा प्राणवायूदाता वटवृक्ष लागवड उपक्रम महाराणी सईबाई शिवाजीराजे भोसले यांच्या स्मरणार्थ २०१८ साला पासून राबविला जात आहे. ह्या वर्षी मुंबई-आग्रा महामार्गावरील राहूड घाटाजवळील वडदरी येथील प्राचीन शनिमंदिर परिसरात वटवृक्षांची लागवड करून या परिसराच्या ह्यवडदरीह्ण या नावास पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.

प्रथमतः श्री शनी मंदिरात श्रीफळ अर्पण करून प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महंत गणेश महाराज होते. यावेळी श्रमदानाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन शांताराम निफाडे, बाळासाहेब म्हस्के, शाम ठाकरे, पंकज ओस्तवाल, राजेंद्र देवरे, संजय देवरे, देवाजी पवार, पुंडलिक पवार, चिंतामण पवार, माणिक साळूके व रमेश साळूके आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, संदीप देवरे, बाळा पवार, रामराव देवरे, अनंत देवरे, शांताराम देवरे, संपत देवरे, महेश वाघ, नामदेव देवरे, शरद नंदाळे, गणेश देवरे, रवींद्र देवरे, गुड्डू रजपूत, दादाजी शिंदे, दिनेश देवरे, दीपक देवरे, शिवराजे देवरे, हर्षल कापडणीस, सतीष जाधव, सुरेश झाडे, भैया झाडे, योगेश झाडे आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Plantation in the Shanimandir area of Ubharane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.