प्रहार संघटनेच्या वतीने मोहाडी येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 20:21 IST2021-07-05T20:20:30+5:302021-07-05T20:21:10+5:30
दिडोरी : दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने मोहाडी येथील सह्याद्री वनराई येथे एक कार्यकर्ता एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला असून परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.

प्रहार संघटनेच्या वतीने मोहाडी येथे वृक्षारोपण
ठळक मुद्देएक कार्यकर्ता एक झाड या आवाहनाला प्रतिसाद
दिडोरी : दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने मोहाडी येथील सह्याद्री वनराई येथे एक कार्यकर्ता एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला असून परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार बच्चु कडू यांनी केलेल्या एक कार्यकर्ता एक झाड या आवाहनाला प्रतिसाद देत दिंडोरी तालूक्यातील मोहाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्ष जतन करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी जयवंत थेटे, राजेंद्र शिंपी, परशराम तिडके, भारत ढेपले, सतिश मंडलिक, वसंत तिड,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.