गुरेवाडी प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:47 IST2019-07-16T17:47:25+5:302019-07-16T17:47:38+5:30

सिन्नर : तालुक्यातील गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने परिसरात ३५ वृृक्षांची लागवड केली. पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली.

Plantation in Gorevadi Primary School | गुरेवाडी प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

गुरेवाडी प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

सिन्नर : तालुक्यातील गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने परिसरात ३५ वृृक्षांची लागवड केली. पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली.
वड, पिंपळ, कडुनिंब, शेवगा, चिंच, जास्वंद व फुलझाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. पाणी फाउंडेशनचे दत्ता निकाळजे, गुरेवाडी विकास संस्थेचे अध्यक्ष शरद सोनवणे, सूर्यभान गांडोळे, सुनीता गांडोळे, रामनाथ गांडोळे, बाजीराव जाधव, संजय झोंबाड, सुरेखा जाधव, अनिल गुरव, प्रकाश पिंपळे, सोपान गांडोळे, वर्षा जाधव, विमल माळी, शांताराम गांडोळे, पांडुरंग सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापिका पद्मा भुसा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात सोमनाथ मोरे व साईनाथ बर्डे यांनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे योगदान दिले.

Web Title: Plantation in Gorevadi Primary School