पंचवटीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:55 AM2019-12-11T00:55:56+5:302019-12-11T00:56:13+5:30

पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर पाणी साचून निर्माण झालेले खड्डे बुजविण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र मुदत संपल्यानंतरदेखील मुख्य वाहतूक मार्गासह नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच पंचवटी मनपाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

 The pits in the panchavati started to quench | पंचवटीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात

पंचवटीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात

googlenewsNext

पंचवटी : पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यावर पाणी साचून निर्माण झालेले खड्डे बुजविण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र मुदत संपल्यानंतरदेखील मुख्य वाहतूक मार्गासह नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच पंचवटी मनपाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पावसाच्या कालावधीत रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पालिका प्रशासनाकडून हाती घेतल्याचे सांगण्यात येत होते. मात्र काही ठिकाणच्या खड्ड्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना जपूनच मार्गक्रमण करावे लागत होते. रस्त्यांवर खड्डे असल्याने सदर खड्डे महापालिकेने करण्याबाबत संबंधितांना आदेश देत मुदतही दिली होती. मात्र प्रत्यक्षात मुदत संपल्यावरदेखील मुख्य रस्त्यावर खड्डे दिसून येत होते. नागरी वसाहतीत अनेक भागांत असलेल्या रस्त्यांवर छोटे-मोठे कायम होते. पंचवटीत डांबरीकरणाचे २४६, तर खडीचे ८१ किलोमीटर रस्ते असून, महापालिकेने २१५२ खड्डे डांबराने व ५१९ मुरुम टाकून बुजविले होते. खड्ड्यांचे साम्राज्य ‘जैसे थे’ याबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या पंचवटी मनपातर्फे शक्तिनगर, हिरावाडी, सरस्वतीनगर, दामोदरनगर आदींसह अन्य नागरी वसाहतीत असलेले रस्ते तत्काळ बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पंचवटी विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी आर. एस. पाटील यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाचे उपअभियंता समीर रकटे, सुनील थलकर, पी. एन. निकम आदींनी नागरी वसाहतीत असलेले खड्डे डांबराचा थर देत बुजविले आहे.

Web Title:  The pits in the panchavati started to quench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.