पाथर्डी फाटा परिसरात गावठी पिस्तूलसह सराईताच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 17:32 IST2017-12-10T17:30:48+5:302017-12-10T17:32:41+5:30
विनोद रामनाथ ठाकरे (२५ रा.श्रमजीवी आदिवासी नगर,शनिमंदिरा मागे,पेठरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.

पाथर्डी फाटा परिसरात गावठी पिस्तूलसह सराईताच्या आवळल्या मुसक्या
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात एक दुचाकीस्वार गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून पेठरोड परिसरातील सराईताच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत गावठी पिस्तूलसह दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे ७० हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद रामनाथ ठाकरे (२५ रा.श्रमजीवी आदिवासी नगर,शनिमंदिरा मागे,पेठरोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजीपुतळा भागात शुक्रवारी रात्री एक तरूण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंबडचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा लावण्यात आला होता. डिओ मोपेड (एमएच १५ डीबी ७११७) वरील दुचाकीस्वाराच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या अंगझडतीत लोखंडी बॉडी असलेला गावठी पिस्तूल मिळून आले. संशयीताच्या ताब्यातून पिस्तूलसह दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक दत्तात्रेय गवारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.