पिंपळगावी कांदा लिलाव बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:00 IST2020-02-08T15:59:54+5:302020-02-08T16:00:40+5:30
पिंपळगाव बसवंत : कांदा दरात सातत्याने होत असलेली घसरण व निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.

पिंपळगावी कांदा लिलाव बंद पाडले
पिंपळगाव बसवंत : कांदा दरात सातत्याने होत असलेली घसरण व निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून संताप व्यक्त केला.
बाजार समितीमध्ये सकाळी नऊ वाजता लिलाव सुरू होत असतो. आठच दिवसात लाल कांदा दरात सातशे ते हजार रूपये प्रती क्विंटल दराने घसरण झाली. सोमवारी दि.१ रोजी कांदा २४०० पासून २७०० पर्यंत प्रती क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केला तर शुक्र वारी १७०० ते २००० रूपयांपर्यंत खरेदी केला. निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत दुबारा कांदा लागवड करून बाजारभावात होणाºया रोजच्या घसरणीने शेतकरी आधीच संतप्त झाले होते. त्यातच केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली. त्यामुळे बाजारभावात घसरन सुरूच राहिली. सकाळी नऊ वाजता शेकडो शेतकºयांनी बाजार समिती आवारात जमा होऊन निर्यात बंदी उठविण्याच्या घोषना दिल्या. आमदार व सभापती दिलीप बनकर यांनी अकरा वाजता तात्काळ शेतकरी वर्गाची भेट घेत शासन दरबारी तातडीने पत्र व्यवहार व भेट घेतली. आठ दिवसात केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली नाही तर रत्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. बनकर यांच्या आश्वासनानंतर दुपारी १२ वाजता लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले.