पिंपळगावी आगीत मंदीर भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:37 IST2019-12-11T12:37:03+5:302019-12-11T12:37:10+5:30
पिंपळगांव बसवंत: येथील म्हसोबा चौकातील प्राचीन महादेव मंदिराला मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली.

पिंपळगावी आगीत मंदीर भस्मसात
पिंपळगांव बसवंत: येथील म्हसोबा चौकातील प्राचीन महादेव मंदिराला मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेत मंदिर भस्मसात झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र मंदीराजवळेच पिंपळगाव शहरातील म्हसोबा चौकात प्राचीन महादेव मंदिर आहे. शहराची शान असलेल्या या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येत. बुधवारी (दि.११) मध्यरात्री दोनच्या सुमारास मंदीरास आग लागली. घटनेची माहिती बबलू अत्तार यांनी अग्निशामक दलास दिली. अग्निशामकचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तीन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यात यश आले. याकामी कर्मचारी बशीर शेख, सुनील आहेर, दत्तात्रय सावकार, ज्ञानेश्वर गवारे यांनी मदतकार्य केले. सकाळी मंडळ अधिकारी नीलकंठ उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी चंद्रकांत पंडित यांनी पंचनामा केला.