पिंपळगाव टोलनाक्यावर बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 18:23 IST2019-02-01T18:23:04+5:302019-02-01T18:23:17+5:30
मारहाणीचा प्रकार : परस्परविरोधी गुन्हा दाखल

पिंपळगाव टोलनाक्यावर बाचाबाची
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव येथील पीएनजी टोल नाका सतत कुठल्या ना कुठल्या वादचे कारण ठरत आहे. बुधवारी (दि.३०) रात्री ११.२५ च्या सुमारास वाहनचालक व टोल कर्मचारी यांच्यात टोल पावती न फाडल्याच्या कारणावरून बाचाबाची होत मारहाणीचा प्रकार घडला आहे. पिंपळगाव पोलीस स्थानकात याप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगांव टोल नाक्यावर निताने ता. बागलाण येथील पंचायत समिती सदस्य फिर्यादी वसंत कडू पवार (वय ३८) हे नाशिककडून मालेगावच्या दिशेने आपल्या वाहनातून (क्र मांक एमएच ४६ एक्स ९९३८) आपल्या चार मित्रांसोबत जात असताना पिंपळगाव टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाच्या पुढे असलेले वाहन (क्रमांक एमएच १८ एजे ७७१२) मधील चालक व टोल कर्मचारी यांच्यात वादविवाद झाला. यावेळी टोलचे व्यवस्थापक हर्षल चौधरी व कर्मचारी भरत बागल यांनी मागील वाहनाचा दरवाजा उघडत मारहाण शिवीगाळ केली आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे टोल व्यवस्थपक व टोल कर्मचारी यांच्याविरूद्ध पिंपळगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर टोल कर्मचारी बागल यांच्या फिर्यादी नुसार वरील वाहन (क्र मांक एम एच ४५ एक्स ९९३८) यातील वसंत कडू पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल न फाडण्याच्या कारणावरून टोल नाक्यावरील बूथ कर्मचारी बागल व अन्य साथीदारांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानुसार पिंपळगाव पोलीस स्थानकात पवार व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांचया मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देवरे, निकम करत आहेत.