पिंपळगावी एकाच दिवशी पुत्रापाठोपाठ पित्याचाही अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:30 IST2021-01-15T17:28:48+5:302021-01-15T17:30:40+5:30
पिंपळगाव बसवंत : पुत्राच्या निधनाची वार्ता कानावर पडताच पित्याचाही हृदयविकाराच्या धक्क्याने अंत झाल्याची हृदयद्रावक घटना येथील घोडकेनगरात शुक्रवारी (दि.१५) सकाळी घडली.

पिंपळगावी एकाच दिवशी पुत्रापाठोपाठ पित्याचाही अंत
पिंपळगाव बसवंत येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करणारे व सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणारे गणेश सूर्यकांत घोडके (४०) यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी (दि. १५) पहाटे उपचार सुरू असताना गणेश यांचे मुंबईत निधन झाले. एकुलत्या एक पुत्राच्या निधनाची वार्ता कानावर येताच सूर्यकांत शिवलिंग घोडके (७५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तेसुद्धा अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी पिंपळगाव येथील मर्चट बँकेचे माजी व्हाइस चेअरमनपद भूषविले होते. दुपारी एक वाजता लिंगायत समाजाच्या रीतिरिवाजनुसार त्यांचा दफनविधी करण्यात आला. गणेश यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. एकाच दिवशी पिता-पुत्राचे निधन झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.