गणेश विसर्जनासाठी पिंपळगाव ग्रामपंचायत तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:30+5:302021-09-19T04:15:30+5:30
पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात ...

गणेश विसर्जनासाठी पिंपळगाव ग्रामपंचायत तयारी पूर्ण
पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून त्यातच गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका बनकर यांनी दिली
मागील वर्षी पिंपळगाव बसवंत येथील कादवा नदीच्या पात्रात गणपती विसर्जनाच्या प्रसंगी पाच ग्रामपंचायत कर्मचारी बुडाले होते. मात्र चार कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले होते. त्यातील एक कर्मचाऱ्याचा कादवा नदीत बुडून दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर्षी कोणतेही विघ्न घडू नये यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकारातून पिंपळगाव बसवंत शहरातील साई नगर, मोरे नगर, घोडके नगर,आदिनाथ नगर आदी ठिकाणी तलाव तर टोल नाका याठिकाणी गणपती पाण्यात न बुडवता आरती करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर यांनी केली आहे.