पिंपळगावी शासन आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:20 IST2020-12-05T04:20:56+5:302020-12-05T04:20:56+5:30

पिंपळगाव बसवंत : शहरातील शासन निर्णयानुसार ज्या गृहनिर्माण सोसायट्या वर्ग-२ मध्ये आहेत, त्या सोसायटींचा १५ टक्के नजराणा भरून त्यांचा ...

Pimpalgaon government at your doorstep | पिंपळगावी शासन आपल्या दारी

पिंपळगावी शासन आपल्या दारी

पिंपळगाव बसवंत : शहरातील शासन निर्णयानुसार ज्या गृहनिर्माण सोसायट्या वर्ग-२ मध्ये आहेत, त्या सोसायटींचा १५ टक्के नजराणा भरून त्यांचा वर्ग १ मध्ये समावेश होणार असल्याची माहिती ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या माध्यमातून निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी उपस्थित सोसायटीच्या सभासदांना दिल्याने शहरातील गृहनिर्माण संस्थेच्या ९९ टक्के सभासदांनी १५ टक्के नजराणा भरण्यास सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.

गृहनिर्माण सोसायटीबाबत शासनाच्या वर्ग-१ची माहिती सोसायटींच्या सभासदांना देण्यासाठी शहरात बैठक झाली. यावेळी निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, पिंपळगाव बसवंत शहराचे मंडळ अधिकारी नीळकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव तसेच ओझरचे मंडलाधिकारी प्रशांत तांबे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

वर्ग-१च्या संदर्भात माहिती देताना तहसीलदार शरद घोरपडे म्हणाले की, ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या गृहनिर्माण सोसायट्या वर्ग २ मध्ये आहेत त्या सोसायटीचा चालू व्हॅल्युएशननुसार १५ टक्के नजराणा भरून वर्ग १ मध्ये समावेश करून घेण्यात येणार आहे. अन्यथा तीन वर्षानंतर वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये समावेश करण्यासाठी अधिक ६० टक्के नजराणा भरावा लागणार असल्याने यात सोसायट्यांचा तोटा असल्याचे तहसीलदार घोरपडे यांनी सांगितले. त्यामुळे उपस्थित ९९ टक्के सदस्यांनी यास संमती दर्शवली. दरम्यान, कायद्याने आम्ही मालक आहोत. ३३ वर्षांपेक्षा जास्त या भूखंडावर आम्ही वास्तव्य केले आहे. त्यामुळे नजराने भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचे यावेळी उपस्थित एक-दोन सदस्यांनी सांगितले. १५ टक्के नजराण्याऐवजी पाच टक्के भरण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगत शासनाच्या त्या निर्णयाला विरोध दर्शविला; मात्र उर्वरित सर्व सभासदांनी १५ टक्के नजराणा भरण्यात सहमती दर्शवत वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये समावेश झालेल्या संस्थांना खरेदी-विक्रीची परवानगी तसेच भविष्यात कुठलीही शासकीय शुल्क भरण्याची गरज पडणार नाही हे ओळखून या योजनेचा लाभ घेण्याची समहती दर्शविली.

इन्फो

आम्हाला विरोधी पक्ष समजू नका

३३ वर्षांपासून आम्ही येथे राहत असून, आम्ही मूळचे मालक आहोत. कायद्याने शासनाला नजराणा घेण्याचा अधिकार नाही. १५ टक्के नाही तर ५ टक्केच नजराणा भरणार असल्याचे उपस्थित एक दोन सदस्यांनी सांगत विरोधी पक्षाप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सवाल करत पिंपळगावचा इतिहाच सांगितला. मात्र आम्हाला विरोधी पक्ष समजू नका, आम्ही तुमच्यासाठीच आलो आहे. शासनाचा निर्णय समजून, घ्या यात तुमचाच फायदा असल्याचे तहसीलदार घोरपडे यांनी सांगितल्यावर ९९ टक्के सभासदांनी ते मान्य करत १५ टक्के भरण्यास संमती दर्शवली

फोटो : ०४ पिंपळगाव गर्व्हमेंट

‘शासन आपल्या दारी’ या योजनेमार्फत गृहनिर्माण सोसायट्यांना वर्ग १ची माहिती देताना प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे. समवेत तहसीलदार शरद घोरपडे, तलाठी राकेश बच्छाव आदी.

===Photopath===

041220\04nsk_21_04122020_13.jpg

===Caption===

शासन आपल्या दारी या योजने मार्फत गृहनिर्माण सोसायट्यांना वर्ग १ ची माहिती देतांना प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे. समवेत तहसीलदार शरद घोरपडे, तलाठी राकेश बच्छाव आदी.

Web Title: Pimpalgaon government at your doorstep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.