पिंपळगाव बसवंतला दोन घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:10 IST2019-05-31T14:10:25+5:302019-05-31T14:10:33+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील उंबरखेडरोडवरील हनुमान नगर येथे शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता रंभाबाई भाऊसाहेब साबळे यांच्या घराला आग लागली.

पिंपळगाव बसवंतला दोन घरांना आग
पिंपळगाव बसवंत : येथील उंबरखेडरोडवरील हनुमान नगर येथे शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता रंभाबाई भाऊसाहेब साबळे यांच्या घराला आग लागली. आगीने काही क्षणातच रूद्र रूप धारण केले. येथील अग्निशमन दलाला काही क्षणातच पाचारण करत आग आटोक्यात आणली. या आगीत रंभाबाई भाऊसाहेब साबळे व आक्काबाई शांताराम भवर या दोन्ही महिलांचे घरातील सर्व साहित्य जळुन खाक झाले. वेळीच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली व संभाव्य इतर घरांचा धोका टळला गेला. पाच वर्षांपुर्वी या झोपडपट्टीतील रस्ता रूंदीकरण केल्याने अग्निशमन दल पोहचू शकले. अन्यथा या ठिकाणची अनेक घरे आगीत सापडली असती असे परिसरातील रहिवाशांनी सांगिगतले. आगीत कुठलीच जिवितहानी झाली नाही. सदर कुटुंबाला ग्रामपंचायत सदस्य बापु कडाळे, संजय मोरे, रामकृष्ण खोडे यांनी धान्य व कपड्यांची मदत केली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.