पिंपळगावी अंगणवाड्यांना चिमुकल्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 17:29 IST2021-02-04T17:27:45+5:302021-02-04T17:29:53+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असलेल्या परिसरातील अंगणवाड्यांना चिमुल्यांची प्रतीक्षा आहे.

पिंपळगावी अंगणवाड्यांना चिमुकल्यांची प्रतीक्षा
ठळक मुद्दे शहरात एकूण ३४ अंगणवाडी
पिंपळगाव बसवंत : गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असलेल्या परिसरातील अंगणवाड्यांना चिमुल्यांची प्रतीक्षा आहे.
शहरात एकूण ३४ अंगणवाडी असून सर्वच अंगणवाडीत मुलांची संख्यादेखील चांगली आहे. नियमित पोषण आहाराची चांगली सुविधा असल्याने अंगणवाडीत मुलांचा किलबिलाट असायचा. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर आतापर्यंत अंगणवाड्या सुरू झालेल्या नाहीत.
राज्य सरकारने शाळा सुरू करणसाठी परवानगी दिली असून १५ फेब्रुवारीनंतर महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आता अंगणवाड्या केव्हा सुरू होतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (०४ पिंपळगाव २)