हजारो दिपांनी उजळले पिंपळगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 14:20 IST2018-11-24T14:20:23+5:302018-11-24T14:20:33+5:30
पिंपळगाव बसवंत : शिवाजीनगर येथे श्री संत जनार्दन स्वामी भक्त परिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्रिपुरारी पोर्णिमेला मंदिराच्या प्रांगणात ११,१११ दिप प्रज्वलित करण्यात आले.

हजारो दिपांनी उजळले पिंपळगाव
पिंपळगाव बसवंत : शिवाजीनगर येथे श्री संत जनार्दन स्वामी भक्त परिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्रिपुरारी पोर्णिमेला मंदिराच्या प्रांगणात ११,१११ दिप प्रज्वलित करण्यात आले.पोर्णिमेच्या प्रकाशात हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला. जमिनीवर दिव्यांची आरास व वर विविध रंगांची आकाशकंदीलांनी नेत्रदीपक दृश्य पाहावयास मिळाले. या कार्यक्र मास सरपंच आक्कासाहेब बनकर, विद्याताई घोडके, पो.निरीक्षक सुरेश मनोरे साहेब यांच्या हस्ते तसेच गणेश बनकर, सत्यभामा बनकर, सतीश मोरे, अल्पेश पारख, किरणभाऊ लभडे, दिपक विधाते इ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. प्रास्तविक अनिल पठाडे यांनी केले. प्रा.उल्हास मोरे, विद्या घोडके, गणेश बनकर, सतिश मोरै,सुरेश मनोरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्र म मर्यादित न राहता या मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी राहुन महाराष्ट्रभर या दिपोत्सवाचा लौकिक वाढवावा असे प्रतिपादन सतिश मोरे यांनी केले.