शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

पायलट आणि सुरक्षा दलात तणाव, राहुल गांधी यांच्या मध्यस्थीने मिटला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 5:02 AM

ओझर विमानतळावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्यावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला.

श्याम बागुल नाशिक : ओझर विमानतळावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्यावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. दोघांनीही आवाज चढविल्याने विमानतळावर तणाव निर्माण झाला.

सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा निर्णय पायलटने घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर दोन्ही बाजूने नरमाईची भूमिका घेण्यात येऊन तणाव निवळला. साधारणत: अर्धातास गांधी यांनी विमानतळावर घालविल्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले.

शनिवारी सकाळी सात वाजेपासूनच ओझर विमानतळावर विशेष सुरक्षा दल व पोलीस यंत्रणा उपस्थित होती. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात एसपीजीने पायलटकडे असलेल्या बॅगेची तपासणी करण्यावरून वाद झाला. मी चार वर्षांपासून गांधींच्या विमानाचा पायलट असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. थोड्याच वेळात राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले. त्यांना शहराध्यक्ष शरद आहेर यांनी वादाची कल्पना दिली. त्यांनी एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर वादावर पडदा टाकण्यात आला.

अग्निशामन वाहनात बसलेविमान उड्डाण घेण्यासाठी वीस मिनिटांचा कालावधी शिल्लक असल्याचे पाहून राहुल गांधी यांचे कोपऱ्यात एचएएलच्या अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. ते चालत तेथे गेले. त्यांनी थेट अग्निशामक दलाच्या बंबावर चढून आतमध्ये बसलेल्या चालक व जवानाशी संवाद साधला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी