शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

रायफलमधून सुटली चुकून गोळी

By admin | Updated: October 12, 2016 00:36 IST

सप्तशृंगगड : आठ जखमी; भाविकांत घबराट

वणी/सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर विजयादशमीला यज्ञकुंडातील होमामध्ये बोकडाचे मुख अर्पण करण्याची परंपरा असून, प्रकोप शांत करण्यासाठी बोकडाचे मुख अर्पण करण्याचे आयोजन विजयादशमीला गडावरील पंचविसाव्या पायरीजवळ आखण्यात आले होते. प्रथेनुसार तयारी सुरू असताना सुरक्षारक्षकाकडून अनावधानाने रायफलचा ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटून आठ जण जखमी झाले.
त्यात मंदिर प्रशासन व न्यासाचे चार कर्मचारी व चार ग्रामस्थ आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गडावर ही घटना घडली. मनोज वाघ कुटुंबीयांकडे हा मान आहे. दत्तमंदिराजवळील उंबराच्या झाडाजवळ व परिसरात हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मुख अर्पण करण्यासाठी बोकड गडावर आणताना गर्दी नियंत्रण मिळवित असताना सैन्य दलातील सेवानिवृत्त व न्यासाच्या सुरक्षारक्षक पथकात कार्यान्वित श्रावण चव्हाण (४८) हे विधिपूर्ततेची प्रतीक्षा करत रायफलने सलामी देण्याच्या तयारीत असताना जमिनीलगत तोंड असलेल्या रायफलच्या ट्रिगरवरील बोट दाबला गेल्याने रायफलीमधील गोळी सुटली. ही सुटालेली गोळी जमिनीवरील फरशीवर आदळली. या गोळीचे तुकडे झाले तसेच गोळी जोरात आदळल्याने फरशीही फुटली.यातील तुकडे उडून सागर दुबे (२८, रा. नांदूर), रामचंद्र पवार (२५), सुरक्षारक्षक शरद सिसोदे (२८), सुरक्षा कर्मचारी गणेश देशमुख, कर्मचारी पद्माकर देशमुख (३०), संतोष पवार, मधुकर गवळी यांना ते लागल्याने जखमी झाले. सागर दुबे यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांच्यासह जखमींना नाशिकच्यां जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बोकडबळीनंतर रायफलने
हवेत फैरी झाडून सलामी देण्याची परंपरा आहे. याचे नियोजन व नियंत्रण यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकारघडला.संबंधित सुरक्षा रक्षकावर गुन्हादाखल कर ण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)