शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

घरी परतताना स्टेटस टाकलं अन् काही वेळातच... नाशिकमध्ये सळईच्या ट्रकमध्ये टेम्पो घुसून भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:05 IST

नाशिकच्या द्वारका परिसरात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला पिकअपची धडक

Nashik Accident: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. द्वारका चौक येथे उड्डाणपुलावर लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून पिकअप टेम्पो आदळला. पीटीआयच्या वृत्तानुसार या अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्कालीन कार्य सुरू करण्यात आलं. जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या अपघातापूर्वी पिकअपमधील तरुणांनी काही मिनिटेआधी पोस्ट केलला धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथून धार्मिक कार्यक्रम आटोपून सिडकोकडे परतताना द्वारका चौकाजवळील उड्डाणपुलावर संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. पिकअप टेम्पो पाठीमागून लोखंडी सळ्यांच्या ट्रकवर जाऊन आदळला. मयत झालेले सर्व लोक सिडकोमधील रहिवासी होते. या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. सिडकोच्या सह्याद्रीनगरमधील चेतन गंभीरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी सिडकोमधील काही भाविक गेले होते. दोन स्वतंत्र टेम्पोमधून प्रवास महिला आणि पुरुष धारणगाव येथील कार्यक्रमासाठी पोहोचले होते. संध्याकाळी कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना सुरुवातीला महिलांचे ट्रेम्पो नाशिक सिडकोच्या दिशेने निघाला होता. महिला प्रवासी असलेला टेम्पो सह्याद्रीनगर येथे पोहचून काही वेळ होत नाही, तोच पुरूषांच्या टेम्पोला द्वारका चौक परिसरात भीषण अपघात झाला.

"पिकअप टेम्पोमध्ये १६ प्रवासी होते. ते निफाडमधील एका धार्मिक कार्यक्रमातून परतत होते. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली. यात काही जणांचा जागीच मृत्यू झाला. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे," अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचा चेंदामेंदा झाला. चालकाला टेम्पो नियंत्रित न झाल्याने त्याने पाठीमागून आयशरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कॅबिनमध्ये बसलेल्या भाविकांच्या शरिरात लोखंडी सळ्या शिरल्या. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस, वाहतूक शाखेचे पोलिस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले होते.

दरम्यान, या अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात सर्व तरुण टेम्पोतून प्रवास करताना दिसत आहेत. अपघातापूर्वी काही वेळाआधीच एका तरुणाने हा व्हिडीओ स्टेटसला ठेवला होता. व्हिडीओत तरुण टेम्पोतून प्रवास करताना नाचताना आणि मजा करताना दिसत होते. व्हिडिओ दिसणाऱ्या काही तरुणांचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. धार्मिक कार्यक्रम आटपून नाशिककडे येत असताना धावत्या टेम्पोमध्ये तरुणांनी हा व्हिडिओ काढला होता.   

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिस