लोहोणेर आठवडे बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:08 IST2020-06-19T16:07:34+5:302020-06-19T16:08:10+5:30
लोहोणेर : - शेजारच्या बागलाण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना व ग्रामपंचायतीच्यावतीने येथील आठवडे बाजार भरणार नाही असे जाहीर करूनही भाजीपाला व इतर विक्र ेत्यांनी लोहोणेर - वासोळ रस्त्यावर आपली दुकाने थाटल्याने फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशी की तैशी करत जमाव बंदीच्या आदेशाला हरताळ फसण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

लोहोणेर आठवडे बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
लोहोणेर : - शेजारच्या बागलाण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना व ग्रामपंचायतीच्यावतीने येथील आठवडे बाजार भरणार नाही असे जाहीर करूनही भाजीपाला व इतर विक्र ेत्यांनी लोहोणेर - वासोळ रस्त्यावर आपली दुकाने थाटल्याने फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशी की तैशी करत जमाव बंदीच्या आदेशाला हरताळ फसण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. लोहोणेर येथे गुरु वारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात भाजीपालासह इतर सर्व लहान मोठे विक्र ेते मोठी गर्दी करीत असतात. आज बाजार भरू नये म्हणून काहीही प्रयत्न ही केलेत.लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने दुपारच्या वेळी गावात सर्वत्र तसे जाहीर करण्यात आले. मात्र या सुचनेची कोणीही दखल न घेता गावा बाहेरून जाणार्या रस्त्यावर गढी लगत मोठ्या प्रमाणात बाजार भरविण्यात आला. सोशल डिस्टक्टशनची दखल न घेता विक्र ेते व खरेदीसाठी मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. जमाव बंदीच्या आदेशाला हरताळ फसण्यात आला. यामुळे प्रशासनाला मात्र याचे कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या बाजारात बाहेर गावाहून आलेल्या विक्र ेत्यांनी व खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच विक्र ेते व खरेदीदार मात्र विना मास्क च बिनधास्तपणे बाजारात वावरताना दिसून आले.