फुलेनगरला सराईत गुन्हेगारांकडून घरात घुसून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 01:22 IST2020-10-27T20:41:49+5:302020-10-28T01:22:10+5:30
पंचवटी : फुलेनगर नगर परिसरात असलेल्या लक्ष्मण नगर येथे सोमवारी सकाळी भरदिवसा सराईत गुन्हेगारांनी कमरेला पिस्तूल लावून व हातात कोयते घेऊन एका महिलेच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटलेल्या प्रकरणी सहा जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुलेनगरला सराईत गुन्हेगारांकडून घरात घुसून तोडफोड
पंचवटी : फुलेनगर नगर परिसरात असलेल्या लक्ष्मण नगर येथे सोमवारी सकाळी भरदिवसा सराईत गुन्हेगारांनी कमरेला पिस्तूल लावून व हातात कोयते घेऊन एका महिलेच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटलेल्या प्रकरणी सहा जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून ताब्यात घेतलेल्या सर्वच संशयितांवर शहरातील पोलिस ठाण्यात मारहाण, चोरी, जबरी लूट, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहेत.
मारहाण व रोकड लूट प्रकरणी सोनी संतोष जाधव या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशांत अशोक जाधव, योगेश प्रल्हाद लांबाडे, रोहन प्रभाकर निकम, अंकुश भूषण सोनवणे, मयूर वाघमारे व जतिन दिलीप साळुंखे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वरील संशयितांनी कमरेला बंदूक लावून व हातात धारदार कोयते घेऊन घरात बळजबरीने प्रवेश करत घरात असलेल्या शांता गुंजाळ, गीता गुंजाळ, मेघा जाधव या महिलांना शिवीगाळ व मारहाण केली तसेच फिर्यादी सोनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जाधव यांनी वार चुकवला असता घरातील आरसा फुटला यावेळी फिर्यादीची मावशी राजश्री गुंजाळ या मदतीसाठी आल्यात या संशयितांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळ काढला.