छायाचित्रकारांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 16:50 IST2019-07-03T16:49:37+5:302019-07-03T16:50:25+5:30

सिन्नर : येथील छायाचित्रकार संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. घोरवड शिवारात झालेल्या स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 Photographer's attributes are appreciated by the students | छायाचित्रकारांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव

छायाचित्रकारांनी केला विद्यार्थ्यांचा गुणगौरव

संघटनेचे अध्यक्ष सचिन बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक अनिल काळे व इक्बाल खान, संजय थोरात, खजिनदार तानाजी सातपुते, सचिव साहेबराव गिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी छायाचित्रकारांचे पाल्य दहावी-बरावी उत्तीर्ण झालेल्या स्नेहल शेलार, अजिंक्य पगार, राजश्री देशमुख यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल काळे यांनी मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष खान यांनी व्यवसाय करताना करावयाची बचत याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष बोरसे यांनी संघटनेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. योगेश घुगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी योगेश भवर, मच्छिंद्र देशमुख, रामहरी वारूंगसे, रमेश पगार, सुदर्शन शेलार, सलिम मनियार, उत्तम कु-हाडे, कैलास केदार, सुदाम सानप, सोपान उगले, भगवान बैरागी, गशेश तांबे आदींसह छायाचित्रकारांसह सहकुटुंब उपस्थित होते.

Web Title:  Photographer's attributes are appreciated by the students