छायाचित्रकाराचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:58 IST2018-11-02T00:55:06+5:302018-11-02T00:58:42+5:30
येवला : शहरातील छायाचित्रकार आनंद अविनाश देसाई (४७) यांचे अपघाती निधन झाले.

आनंद देसाई
ठळक मुद्देकोपरगाव-शिर्डी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून धडक
येवला : शहरातील छायाचित्रकार आनंद अविनाश देसाई (४७) यांचे अपघाती निधन झाले. देसाई दर गुरु वारी पायी साई दर्शनासाठी शिर्डी येथे जात असत. कोपरगाव-शिर्डी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. मेंदूला जबर फटका बसला. दरम्यान, उपचारासाठी प्रवरानगर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. येवला शहरात छायाचित्रण क्षेत्रातील मोजक्या नावात अविनाश देसाई यांचे नाव घेतले जाते. वडिलांचा वारसा आधुनिक तंत्राचा वापर करून त्यांनी नावारूपाला आणला.