कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने चोरला मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:36 IST2018-10-20T14:34:44+5:302018-10-20T14:36:13+5:30

नाशिक : कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने डॅश बोर्डवर ठेवलेला महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ ठाणे येथील शिवाजीनगरमधील रहिवासी शौकतअली लियाकतअली यांनी शुक्रवारी एका इसमास कारमध्ये लिफ्ट दिली़ या इसमाने द्वारका रॅम्पजवळ आल्यानंतर कारच्या डॅशबोर्डवरील महागडा मोबाईल नजर चुकवून चोरून नेला़ या प्रकरणी अली यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

This phone has a lift in the car | कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने चोरला मोबाईल

कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने चोरला मोबाईल

ठळक मुद्देद्वारका रॅम्पजवळ घटना

नाशिक : कारमध्ये लिफ्ट दिलेल्या इसमाने डॅश बोर्डवर ठेवलेला महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़
ठाणे येथील शिवाजीनगरमधील रहिवासी शौकतअली लियाकतअली यांनी शुक्रवारी एका इसमास कारमध्ये लिफ्ट दिली़ या इसमाने द्वारका रॅम्पजवळ आल्यानंतर कारच्या डॅशबोर्डवरील महागडा मोबाईल नजर चुकवून चोरून नेला़ या प्रकरणी अली यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

खिडकीतून मोबाईलची चोरी
नाशिक : जुनी तांबटलेन मधील रहिवासी संजय गाडे (कासार कालिका मंदिराशेजारी) यांच्या पुतणीचा महागडा मोबाईल फोन चोरट्यांनी घराच्या खिडकीतून हात घालून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

जेलरोड परिसरातील तरुणाची आत्महत्या
नाशिक : २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जेलरोडजवळील कॅनाल रोड परिसरात शुक्रवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास घडली़ संदीप रमेश बस्ते (रा़ अभिषेक पार्क, सुमोननगर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: This phone has a lift in the car