पाथरे शिवारात पेट्रोलचा टॅँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:37 IST2019-04-06T23:37:01+5:302019-04-06T23:37:21+5:30

पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील पाथरे शिवारातील बिरोबा मंदिराजवळील पुलाचे कठडे तोडून रस्त्याच्या खाली पेट्रोलने भरलेला टँकर शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Petrol tanker in Paththa Shivar is over | पाथरे शिवारात पेट्रोलचा टॅँकर उलटला

पाथरे शिवारात पेट्रोलचा टॅँकर उलटला

ठळक मुद्दे पेट्रोलने भरलेला टँकर जर पुलाच्या खालीच कोसळला असता तर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती;

पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील पाथरे शिवारातील बिरोबा मंदिराजवळील पुलाचे कठडे तोडून रस्त्याच्या खाली पेट्रोलने भरलेला टँकर शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मुंबई येथून इसार कंपनीचे सुमारे बारा हजार लिटर पेट्रोल घेऊन सदर टँकर औरंगाबाद येथे जात होता. पाथरेजवळील पुलाच्या वळणावर दुसऱ्या गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर पुलाचा कठडा तोडून रस्त्याच्या बाजूला उलटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल गळती झाली. यात गाडीतील पेट्रोल गळल्याने आर्थिक हानी झाली; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शनिवारी सकाळी दोन क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यात पडलेला टँकर काढण्यात आला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती. तसेच कोणत्याही
प्रकारची दुर्घटना घडू नये तसेच सावधगिरीची उपाययोजना म्हणून सिन्नर नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली होती. वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी उपस्थित होते. पेट्रोलने भरलेला टँकर जर पुलाच्या खालीच कोसळला असता तर मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती; परंतु असा कुठलाही प्रकार घडला
नाही.

Web Title: Petrol tanker in Paththa Shivar is over

टॅग्स :Accidentअपघात