पेट्रोल टँकरची कंटेनरला धडक, चालक ठार
By नामदेव भोर | Updated: June 19, 2023 18:08 IST2023-06-19T18:07:20+5:302023-06-19T18:08:11+5:30
या प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल टँकरची कंटेनरला धडक, चालक ठार
नाशिक : रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून पेट्रोल वाहतूक करणारा टँकर धडकल्याने झालेल्या अपघातात पेट्रोल टँकरचा चालक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री नववा मैल आडगाव येथे घडली आहे. या प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव येथील अपघातात मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील टँकर चालक भूपेश नागो मगर (२७) ठार झाला आहे. मगर त्याच्या ताब्यातील पेट्रोल टँकर घेऊन शुक्रवारी (दि. १६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मालेगाव येथून मुंबईकडे जात असताना गरवारे पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर थांबून असलेल्या कंटनेरला जाऊन धडकला. त्यात मगर गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.