शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

पेट्रोल १८, तर डिझेल ६९ पैसे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:43 IST

नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात केली आहे. परंतु, रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीममुळे शनिवारी (दि. ६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून, रोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.

ठळक मुद्दे पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी

नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात केली आहे. परंतु, रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीममुळे शनिवारी (दि. ६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून, रोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.केंद्र सरकारने गेल्यावर्षी १६ जून २०१७पासून डायनॅमिक फ्यूएल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीमची सुरुवात केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर ९१.७९ रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर ७९.३१ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून, डिझेलमध्ये दीड रुपयाची कपात केली आहे. परंतु, शनिवारी पेट्रोल १८ पैशांनी महागले असून, डिझेल ६९ पैशांनी महागल्याने सरकारचे कर कपात करून इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न थिटे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये इंधन दरवाढीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, केंद्र सरकारने रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टिममध्येच कायमस्वरूपी बदल करण्यासोबतच पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून होत आहे.