पेठ पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड
By Admin | Updated: July 14, 2017 00:39 IST2017-07-14T00:30:35+5:302017-07-14T00:39:54+5:30
पेठ पोलिसांनी धाड टाकून मटका लावण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व रोकड जप्त केली.

पेठ पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : येथील काष्टीची आळी परिसरात एका खासगी घरात मटक्याचा अड्डा चालवला जात असल्याच्या खबरीवरून पेठ पोलिसांनी धाड टाकून मटका लावण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व रोकड जप्त केली.
गुरु वारी दुपारी पेठ पोलिसांच्या गस्ती पथकाने बलसाड रोडवरील काष्टीच्या आळी परिसरात अजय गुल्लू शहा हा संशयित मटका चालवत असल्याने पोलिसांनी छापा टाकला. मटक्यासाठी अंक लिहिलेल्या पावत्या, ५६० रु पयांची रोकड या कारवाईत जप्त केली. पेठ शहरात अनेक दिवसापासून अवैध व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असल्याने सभापती पुष्पा गवळी यांनी संशयितांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. शहरातील तरु णांनी या विरोधात आंदोलनही छेडले होते.