पेठ राष्ट्रीय मतदार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:18 IST2021-01-25T19:29:02+5:302021-01-26T02:18:21+5:30
पेठ : नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखा व जनता विद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

पेठ येथील जनता विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेताना अधिकारी व शिक्षक.
पेठ : नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखा व जनता विद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी नवमतदारांना शपथ देण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य कल्पना शिरोर, निवडणूक नायब तहसीलदार सुदेश निरगुडे, तलाठी हेमंतकुमार राऊत, लिपिक बळीराम केकान, लोटान गायकवाड, जयश्री पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.