पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:52 IST2020-06-26T16:47:52+5:302020-06-26T16:52:22+5:30
पेठ : शेजारच्या दिंडोरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पेठ शहर पाच दिवसांसाठी बंद
पेठ तालुका ग्रीन झोनमध्ये असला तरी दिंडोरी व हरसूल येथे कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आल्याने पेठवासियांनी धसका घेतला आहे. दररोज शहरात व्यवसाय व खरेदी विक्र ीच्या निमित्ताने शेजारच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ लक्षात आल्याने पेठ शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने सम- विषम फॉर्म्यूला लागू केला असला तरी गर्दीवर फारसे नियंत्रण नसल्याने व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन शुक्र वार ते मंगळवारपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात केवळ मेडीकल व दवाखाने सुरू ठेवण्यात येणार असून किराणासह इतर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.