Pet dogs killed in tempo shock; Police register crime on driver | टेम्पोच्या धडकेत पाळीव श्वान ठार; पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल
टेम्पोच्या धडकेत पाळीव श्वान ठार; पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देइंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला

नाशिक : भरधाव वेगात टेम्पो चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत एका पाळीव श्वानाला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेले श्वान जागीच ठार झाले. याप्रकरणी श्वानच्या मालकाने टेम्पोचालकाविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्चना काळे (३४ रा नंदनवन रो हाऊस, कलानगर ) यांच्या पाळीव श्वानाला सोमवारी (दि.११) साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या टेम्पोने (एम.एच.१५ सीके ४४३३) कलानगर ते भैय्या वाडी दरम्यानच्या रस्त्यावर धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. यामुळे काळे यांनी टेम्पो चालकाविरूध्द बेदरकारपणे वाहन चालवित श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून चालक संशियत आरोपी गौतम गोटेविरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Web Title: Pet dogs killed in tempo shock; Police register crime on driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.