कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 19:02 IST2018-11-03T19:02:25+5:302018-11-03T19:02:39+5:30
कत्तलीच्या हेतूने २८ हजार रूपये किंमतीचे चार जनावरे दोरीने जखडून बांधून घेवून जाणाºया शेख मोबीन शेख रा. इस्लामपुरा याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणाऱ्याला अटक
मालेगाव : कत्तलीच्या हेतूने २८ हजार रूपये किंमतीचे चार जनावरे दोरीने जखडून बांधून घेवून जाणाºया शेख मोबीन शेख रा. इस्लामपुरा याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून जनावरे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विशाल गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. मोबीन शेख हा विनापरवाना कत्तलीच्या हेतूने जनावरे घेवून जाताना आढळून आला. पुढील तपास हवालदार बनकर करीत आहेत.