शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

शहरातील  धोकादायक वृक्षतोडीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:06 AM

शहरातील काही वृक्ष धोकादायक असल्याचे सांगत ते तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवले जातात; परंतु बºयाचदा पाहणीदरम्यान सदर वृक्ष धोकादायक नसल्याचे आढळून येते. त्यामुळे, यापुढे धोकादायक वृक्षांसंदर्भात पाहणी अहवालात पूर्ण कारणमीमांसा केल्यानंतरच वृक्षतोडीस परवानगी देण्याचा निर्णय वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : शहरातील काही वृक्ष धोकादायक असल्याचे सांगत ते तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवले जातात; परंतु बºयाचदा पाहणीदरम्यान सदर वृक्ष धोकादायक नसल्याचे आढळून येते. त्यामुळे, यापुढे धोकादायक वृक्षांसंदर्भात पाहणी अहवालात पूर्ण कारणमीमांसा केल्यानंतरच वृक्षतोडीस परवानगी देण्याचा निर्णय वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  वृक्षप्राधिकरण समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी काही धोकादायक वृक्ष तोडण्यासंबंधीचे प्रस्ताव समितीपुढे मांडण्यात आले, तर काही वृक्ष धोकादायक नसल्याने ते तोडण्याची गरज नसल्याचेही प्रस्ताव ठेवण्यात आले. विभागीय अधिकाºयांमार्फत बºयाचदा प्राप्त तक्रारीनुसार धोकादायक वृक्ष तोडण्यासंबंधीचे प्रस्ताव समितीकडे पाठविले जातात; परंतु प्रत्यक्ष पाहणी अहवालात तक्रारीत तथ्य आढळून येत नाही. त्यामुळे यापुढे पाहणी अहवालात धोकादायक वृक्षतोडीसंबंधी त्याची पूर्ण कारणमीमांसा केल्याशिवाय प्रस्ताव ठेवण्यात येऊ नये.  कारणमीमांसा नसलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे यावेळी ठरविण्यात आले. दरम्यान, काही वृक्षतोडीच्या प्रस्तावाबाबत फेरपाहणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १६ मधील इच्छापूर्ती फूड्स उपनगर येथील एक रेन ट्री धोकादायक स्थितीत वाटत नसल्याने तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, सदर वृक्षाच्या मुळ्यांमुळे पेव्हर ब्लॉक वर आल्याने ते काढून बुंध्याभोवती चबुतरा बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, समितीने चबुतरा बांधण्यास परवानगी नाकारली.  यावेळी काही वृक्षांच्या फांद्यांचा विस्तार कमी करण्यासही मान्यता देण्यात आली. दरम्यान, उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग स्वतंत्र करण्याची मागणी सदस्यांनी केली असता सद्यस्थितीत उपलब्ध मनुष्यबळ पाहता ते शक्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.  बैठकीला अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, प्रभारी उद्यान अधीक्षक रौंदळ, सदस्य मच्छिंद्र सानप, श्याम साबळे, आशा तडवी, शेखर गायकवाड, योगेश निसाळ, संदीप भवर आदी उपस्थित होते.वृक्षांभोवती जाळ्या लावा समितीच्या बैठकीत काही धोकादायक नारळ वृक्ष तोडण्यासंबंधीचेही प्रस्ताव ठेवण्यात आले होते. परंतु, धोकादायक नसतानाही काही वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर वृक्ष तोडण्याऐवजी वरती नारळाभोवती जाळ्या लावण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे नारळ खाली पडून कुणाला इजा होणार नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका