लोकोपयोगी उपक्रम : महाराष्ट्र अस्थिरोग असोसिएशनचा स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम अस्थिरोग रुग्णांना जयपूर फुटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:36 IST2018-05-05T00:36:02+5:302018-05-05T00:36:02+5:30
नाशिक : हल्लीचे युग हे फास्टफूडचे युग आहे. शरीराला पोषक घटक मिळत नसल्यामुळे ज्या मुख्य घटकांवर शरीर उभे आहे अशा हाडांचा ठिसूळपणा वाढत आहे.

लोकोपयोगी उपक्रम : महाराष्ट्र अस्थिरोग असोसिएशनचा स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम अस्थिरोग रुग्णांना जयपूर फुटचे वाटप
नाशिक : हल्लीचे युग हे फास्टफूडचे युग आहे. शरीराला पोषक घटक मिळत नसल्यामुळे ज्या मुख्य घटकांवर शरीर उभे आहे अशा हाडांचा ठिसूळपणा वाढत आहे. यामुळे संधिवात, गुडघेदुखी व हाडांचे विविध विकार उद्भवू लागले आहेत. ते थांबविण्यासाठी प्रत्येकाने गांभीर्याने चांगली जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन संघटनेचे सचिव डॉ. राजेंद्र खैरे यांनी केले. महाराष्ट्र अस्थिविकार असोसिएशनच्या माध्यमातून वर्धापन दिनानिमित्त श्रीगुरु जी रुग्णालयात पार पडलेल्या कार्यक्र मात डॉ. खैरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. राकेश कनोजिया, अध्यक्ष डॉ. मिलिंद पिंप्रीकर, डॉ. संजय धुर्जड, डॉ. राजेंद्र खैरे, डॉ. सागर काकतकर, डॉ. गौरव कुलश्रेष्ठ, डॉ. उत्कर्षा काकतकर, डॉ. मयूर सरोदे उपस्थित होते.
हाडांच्या विकारावर आज चांगले उपचार उपलब्ध असून, डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे पालन करावे. वैद्यकीय क्षेत्रातील माहिती अद्ययावत ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. सागर काकतकर यांनी गुडघ्यांची झीज, डॉ. गौरव कुलश्रेष्ठ यांनी मणकेविकार एक समस्या, तर डॉ. उत्कर्षा काकतकर यांनी अपघातानंतरचे प्रथमोपचार या विषयावर व्याख्याने दिली. त्याचप्रमाणे डॉ. शैलेंद्र पाटील यांनी अस्थिव्यंग या विषयावर व्याख्यान केले. राज्यात संघटनेचे १७०० सभासद असून, संघटना सभासदांसाठी, वैद्यकीय ज्ञानवृद्धीसाठी तसेच त्यांना आलेल्या समस्या निवारणासाठी काम करते.