शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या उड्या

By admin | Updated: May 25, 2017 18:52 IST

नाशिक वनविभाग पुर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत नाशिक, दि. 25 - येवला तालुक्यातील नाशिक वनविभाग पुर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर असलेल्या या राखीव वनक्षेत्रात काळवीटच्या उड्या वाढल्याने शुभ वर्तमान मानले जात आहे. ममदापूर संवर्धन राखीव जंगलात हरणाच्या काळवीट प्रजातीची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात झालेल्या प्रगणनेअंतर्गत सुमारे एक हजार ४२ काळवीट आढळून आले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्क्यांनी काळविटांच्या संख्येत वाढ झाल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले.

नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण, रेंदळे या गावांच्या परिसरात विस्तारलेले जंगल काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काळविटांची संख्या वाढण्यासाठी त्यांना पोषक असे वातावरण व योग्य त्या सोयी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण संवर्धन क्षेत्रात ठिकठिकाणी वनविभागाच्या वतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे.

 

तसेच सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्याने पाण्याची मोठी समस्या मार्गी लागली आहे. यामुळे काळविटांचे जंगलातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्याची सोय व गवतासह अन्य प्रकारच्या झाडाझुडपांची लपण संवर्धन क्षेत्रात वाढविण्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भर दिल्यामुळे काळविटांचा संवर्धन क्षेत्रात मुक्काम वाढीस लागला आहे. या वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या परिसरात लांडगा, मोर, तरस, रानडुक्कर यांचेही संवर्धन होत आहे. काळविटांची भटकंती थांबल्याने सुरक्षा बळकट झाली आहे.

 

वन्यजिवांची आकडेवारी अशी...कक्ष क्र =        काळवीट (नर) - काळवीट (मादी) - बछडे -  मोर  - लांडगा -   खोकड -  तरस -  रानडुक्करममदापूर -          ५७                 ९५                      १        -           -               १          -             -ममदापूर -           १०                  ३०                     ५ -                  २             २          १             ७                   रेंदळे -                 ७५                 १८६                     -       ३२        २             ७         -              -                                                                                            राजापूर -             ३२                  ६४                     १५      १८        ४               -          -             - पिंपळकुटे -          २३                 १०३                    १४      २०       २               -         -             १२राजापूर (५३५) -   ११                  ०४२                    ४       १५        ४               -         -              -सोमठाण -            १६                  ०५७                   ८        ६          ४              -        ०२            -देवदरी/खरवंडी -    १७                  ०२८                   -         १४         २             -         ०१          ०३रहाडी-                 ५६                   ७०                   ११          -          -             -           -            -एकूण -                २९७                ६७५                  ७०      १०८        २०         १०         ०४        २२

मेंढपाळांच्या चराईचे आव्हानराखीव वनक्षेत्राच्या परिसरात पावसाळ्यापासून पुढे चार ते सहा महिन्यांपर्यंत मेंढपाळांच्या चराईचे मोठे आव्हान वनविभागापुढे आहे. वनक्षेत्राच्या परिसरात मेंढपाळांकडून घुसखोरी करून मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या जात असल्यामुळे गवताची विल्हेवाट लागते. मेंढ्यांच्या खुऱ्यांमुळे गवत खुरडले जाते तसेच मेंढ्या मुळापासून गवत खात असल्यामुळे गवताची वाढ होत नाही आणि गवत पावसाळ्यानंतर चार महिन्यांतच नष्ट होण्यास सुरूवात होते. यामुळे यंदा वनखात्याला संवर्धन क्षेत्राच्या संरक्षणाच्या दृष्टिने तटबंदी अधिक बळकट करावी लागणार आहे.

 

पाच महिन्यांत दोन हल्ले, एक अपघातममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये पाणवठे व सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्यामुळे काळविटांचा जंगलात मुक्काम वाढला आहे. यामुळे दुर्घटनांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करताना कुत्र्यांच्या हल्ल्यात किंवा वाहनांच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी अथवा जखमी होण्याच्या घटना घडत होत्या. या पाच महिन्यांत कुत्र्यांनी काळविटांवर दोनदा हल्ले केले तर एकदा अपघातात काळवीट जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी अपघात व कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या सुमारे दहा ते पंधरा घटना घडल्या होत्या.