Pedestrian's mobile snatched | पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला

पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला

पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला

नाशिक : पादचाऱ्याचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हिसकावल्याची घटना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर घडली. सचिन एलिंजे (४६, रा. साहिल अपार्टमेंट, पामरोड, बदलापूर, ठाणे) हे त्र्यंबकरोडने मोबाइलवर बोलत पायी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एलिंजे यांचा मोबाइला हिसाकवून पोबारा केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

 

बागवानपुऱ्यात युवकाला मारहाण

 

नाशिक : किरकोळ वादातून युवकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना भद्रकालीतील बागवानपुरा परिसरात घडली. सल्लू ऊर्फ आब्बास रफिक सैय्यद (२२, शैहनशहा टुळकीदर्गाजवळ, बागवानपुरा) याला संशयित जाफर पिंजारी, फरिदा जाफर पिजारी, जुवेद पिंजारी, जावेद पिंजारी यांनी दुचाकीचे शिट धुण्याच्या पाण्याचे ओले झाल्याची विचारपूस केल्याच्या रागातून मारहाण केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

 

उघड्या घरातून २६ हजारांची चोरी

 

नाशिक : उघड्या घरातून २६ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जुना गंगापूर नाका परिसरात घडली. किरण माधव सानप (२५, रा. ज्ञानदीप सोसायटी, जुना गंगापूर नाका) यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी लॅपटॉप, मोबाइल, घड्याळ लंपास केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

एटीएम कार्डच्या माहितीद्वारे ५० हजारांना गंडा

 

नाशिक : एटीएम कार्डचा डेटा व पिन चोरून महिलेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सरिता श्रीरामपुरी गोसावी (४५, रा. बालाजी निवास, सरस्वतीनगर, रासबिहारी-मेरी लिंक रोड) यांच्या एटीएम कार्डचा डेटा व पिन चोरून अज्ञात चोरट्यांनी मालेगाव, शिरपूर, देवास आदी ठिकाणांहून ५० हजार काढून घेतले. याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

कामटवाड्यातून दुचाकी लांबविली

 

नाशिक : सौरभ जयप्रकाश वाघ (२७, रा. साईदर्शन रो-हाऊस, रामेश्वरनगर, कामटवाडे, सिडको) यांनी स्वमालकीची दुचाकी (एमएच १५ ईव्ही ००१३) घराबाहेर उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती लांबविली. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

 

चुंचाळे परिसरात घरफोडी

 

नाशिक : घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अंबड लिंकरोडवरील चुंचाळे परिसरात उघडकीस आली. सुनंदा अशोक सोनवणे (४५, रा. विराट संकुल, तुळजा भवानी चौक, चुंचाळे) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील तीन सोन्याच्या अंगठी व कानातले घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

 

खडकाळी भागात जुगार अड्ड्यावर छापा

 

नाशिक : भद्रकाली परिसरातील खडकाळी येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. संशयित अजय विलास शिंपी (४९, रा. गणेशबाबानगर, सिध्दार्थ हॉटेलमागे), मजहर रजाक सैय्यद (६१, रा. मेनरोड), हानिफ नूर मोहम्मद (६३, रा. कोकणीपुरा), अशोक पोपट साळवे (४७, रा. मालेगाव स्टँड), नशीर बाबुलाल बागवान (५२, रा. गंजमाळ) आदी अंदर-बाहार नावाचा जुगार खेळाताना आढळून आले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व संशयितांना न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.

---

 

सातपूरला युवकाची आत्महत्या

 

 

नाशिक : परमेश्वर प्रकाश वाघमारे (२१, रा. महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) याने राहत्या घरातील लाकडी ॲंगलला अडगळीतील वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मद्याच्या नशेत तसेच नैराश्यातून वाघमारेने आत्महत्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Pedestrian's mobile snatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.