सिन्नर येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:35 IST2018-10-02T15:35:45+5:302018-10-02T15:35:56+5:30

सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गावरील हाटेल सर्वज्ञ समोर दुचाकीने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.

Pedestrian killed in a wheelchair at Sinnar | सिन्नर येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

सिन्नर येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गावरील हाटेल सर्वज्ञ समोर दुचाकीने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चंदन विजय चौधरी (वय२५) रा. छपरा ता. साहेबगंज (बिहार) हल्ली रा. राजाराणी स्टील कंपनीच्या पाठीमागे, माळेगाव एम.आय.डी.सी. हे मयत झाले आहे. रविवारी दुपारी चौधरी हे रस्त्याने पायी जात असतांना हाटेल सर्वज्ञ समोर दुचाकीवरून (एम. एच.१८ ६६१३) भरधाव वेगाने आलेल्या तरूणाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर मार लागलेल्या चौधरी यांचा मृत्यू झाला. सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Pedestrian killed in a wheelchair at Sinnar

टॅग्स :Nashikनाशिक