मालेगावी अज्ञात वाहनाची धडक, पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 01:17 IST2022-03-03T01:16:44+5:302022-03-03T01:17:18+5:30

मालेेगाव: शहरातील शालिमार हॉटेलवर जेवणासाठी गेलेल्या जहीर अहमद सईद अहमद (२४) रा. गालिबनगर किल्ला झोपडपट्टी यास महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.

Pedestrian killed in Malegaon collision | मालेगावी अज्ञात वाहनाची धडक, पादचारी ठार

मालेगावी अज्ञात वाहनाची धडक, पादचारी ठार

मालेेगाव : शहरातील शालिमार हॉटेलवर जेवणासाठी गेलेल्या जहीर अहमद सईद अहमद (२४) रा. गालिबनगर किल्ला झोपडपट्टी यास महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जहीर अहमद हा त्याच्या मित्रांबरोबर जेवणासाठी हॉटेलवर गेला होता. जेवण झाल्यावर घराकडे परत येत असताना रस्ता पार करताना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्यावर तो जोरात फेकला जाऊन जागीच ठार झाला. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी त्याच्या घरी कळविले. किल्ला पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज मंगळवारी सकाळी त्याचा बडाकब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

Web Title: Pedestrian killed in Malegaon collision