अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 20:50 IST2021-09-24T20:50:22+5:302021-09-24T20:50:22+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुलजवळील चिंचवड येथे मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान रस्त्याच्या कडेने शौचास जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या वाहनाने पादचारी प्रकाश तुकाराम महाले (४८, रा. चिंचवड) यास धडक दिल्याने ठार झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार !
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसुलजवळील चिंचवड येथे मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान रस्त्याच्या कडेने शौचास जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या वाहनाने पादचारी प्रकाश तुकाराम महाले (४८, रा. चिंचवड) यास धडक दिल्याने ठार झाला.
याबाबत हरसुल पोलिसांना माहिती मिळताच हरसुल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येऊन सर्व सोपस्कार पार पाडले, तर हरसुल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
याबाबत मृताचा भाऊ भरत तुकाराम महाले (४४) यांनी हरसुल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याबाबतचा अधिक तपास सपोनि गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हरसुल पोलीस करीत आहेत.