भरधाव कारच्या धडकेने पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:18 IST2021-02-23T00:16:34+5:302021-02-23T00:18:13+5:30
वणी : भरधाव वेगातील कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या इसमास राँग साइडने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला.

भरधाव कारच्या धडकेने पादचारी ठार
ठळक मुद्देअनियंत्रित कारने पवार यांना धडक दिली.
वणी : भरधाव वेगातील कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या इसमास राँग साइडने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला.
वणी पिंपळगाव रस्त्यावरील तिसगाव शिवारातील पेट्रोलपंप लगतच्या परिसरात सचिन दामोदर गायधनी (२८, रा.शिंदेमळा ) याने आपल्या ताब्यातील हुंडाई कार (एमएच १५- जीएकस - ६६०२) ही वणी बाजुकडून पिंपळगाव रस्त्याकडे चालवून घेऊन जात होते. त्याच सुमारास अमृत जालदू पवार (३०, रा.टाकळीपाडा आहवा, जिल्हा डांग) हा पायी रस्त्याने जात असताना अनियंत्रित कारने पवार यांना धडक दिली. त्यात अमृत पवार ठार झाले. कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.