शेतकऱ्याच्या मदतीने वाचले मोराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:26 IST2020-08-26T16:26:24+5:302020-08-26T16:26:24+5:30
देवगाव : देवगाव येथे अस्वस्थ अवस्थेत असलेल्या मोराला येथील शेतकºयाच्या मदतीने जीवदान मिळाले आहे.

शेतकऱ्याच्या मदतीने वाचले मोराचे प्राण
देवगाव : देवगाव येथे अस्वस्थ अवस्थेत असलेल्या मोराला येथील शेतकºयाच्या मदतीने जीवदान मिळाले आहे.
देवगाव जवळील धानोरे रस्त्यालगत गट क्र मांक ५९७/१/२ मध्ये शेतकरी जयवंत लोहारकर हे शेतीकामासाठी आपल्या शेतात गेले असता त्यांना अस्वस्थ अवस्थेत मोर आढळून आला. त्यांनी तात्काळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी आर. आर. टर्ले यांना संपर्क केला. टर्ले व कर्मचारी एन. के. सोनवने यांनी या मोरावर प्रथमोपचार केले. त्यानंतर येवला वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रा. संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक बी. सी. शेख यांनी उपचार करून मोर निफाड वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी संजय लोहारकर, वेफको संचालक अनिल बोचरे, सचिन लोहारकर यांनी सहकार्य केले.
(फोटो २६ देवगाव)
देवगाव येथील धानोरा रस्त्यालगत लोहारकरवस्तीवर अस्वस्थ मोरावर उपचार करतांना पशुवैद्यकीय अधिकारी आर. आर. टर्ले समवेत जयवंत लोहारकर, अनिल बोचरे, संजय लोहारकर आदी.