पिंपळगाव बसवंतला शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:40 IST2020-03-06T23:40:20+5:302020-03-06T23:40:49+5:30
शहरात १२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती उत्साहात साजरी करा; पण ध्वनिप्रदूषण टाळा, असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या उपअधीक्षक अरु ंधती राणे यांनी केले. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्ताने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

पिंपळगाव पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना उपअधीक्षक अरुंधती राणे. समवेत उपस्थित सदस्य.
पिंपळगाव बसवंत : शहरात १२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती उत्साहात साजरी करा; पण
ध्वनिप्रदूषण टाळा, असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या उपअधीक्षक अरु ंधती राणे यांनी केले. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्ताने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय महाजन, कुणाल सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य अल्पेश पारख, किरण लभडे, खरात, प्रशांत घोडके, मयूर गावडे, बाळासाहेब आंबेकर, रोहित कापुरे, दीपक मोरे, किरण धुमाळ, सत्यजित मोरे, आशिष बागुल आदी उपस्थित होते.
पिंपळगाव बसवंतचे नागरिक प्रत्येक सण-उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करतात व भविष्यातही साजरे करू, असे गफार शेख यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी आभार मानले.