नाशिक मनपाच्या प्रशासकपदाची सूत्रे पवार यांनी स्वीकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 01:56 IST2022-03-25T01:56:36+5:302022-03-25T01:56:57+5:30

महापालिकेचे नूतन आयुक्त आणि प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.२४) मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. जाधव यांची मात्र नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती झालेली नाही.

Pawar accepted the post of Nashik Municipal Corporation Administrator | नाशिक मनपाच्या प्रशासकपदाची सूत्रे पवार यांनी स्वीकारली

नाशिक मनपाच्या प्रशासकपदाची सूत्रे पवार यांनी स्वीकारली

नाशिक- महापालिकेचे नूतन आयुक्त आणि प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.२४) मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. जाधव यांची मात्र नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती झालेली नाही. महापालिका क्षेत्रातील एक एकर क्षेत्राच्या गृहनिर्माण बांधकाम प्रकल्पातील सदनिका म्हाडाला दिल्या नाहीत म्हणून विधान परिषदेत हा विषय गाजत असतानाच नाशिक महापालिकेचे नूतन प्रशासक तथा आयुक्त म्हणून मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. घरकुल प्रकरणात कैलास जाधव यांची बदली झाली असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात तसे नसल्याचे सांगण्यात आले. नूतन आयुक्त बुधवारीच सूत्रे स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, प्रत्यक्षात त्यांनी गुरुवारी (दि.२४) सूत्रे स्वीकारली. दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास त्यांचे आगमन झाले आणि त्यानंतर त्यांनी कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर आयुक्तांनी

खातेप्रमुखांची बैठक घेऊन जबाबदाऱ्या जाणून घेतल्या.

Web Title: Pawar accepted the post of Nashik Municipal Corporation Administrator