जिल्हा रुग्णालयात रुग्णाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:24 IST2020-09-12T23:05:14+5:302020-09-13T00:24:50+5:30
नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.१२) एका २६ वर्षीय रुग्णाने संध्याकाळच्या सुमारास येथील पुरुष सामान्य कक्षातील स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

जिल्हा रुग्णालयात रुग्णाने घेतला गळफास
नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.१२) एका २६ वर्षीय रुग्णाने संध्याकाळच्या सुमारास येथील पुरुष सामान्य कक्षातील स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
सिन्नर येथील मुसळगावमधील रहिवासी असलेला सचिन दादाजी सोनवणे (२६) हा जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल झाला होता. मद्यप्राशनाचे व्यसन असलेल्या या युवकाची शरीरयष्टी अत्यंत सडपातळ होती. त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र त्याने शनिवारी सायंकाळी येथील स्वच्छतागृहात जाऊन गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, दुसरा रुग्ण स्वच्छतागृहात जात असताना त्याचा हा प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ कक्षातील परिचारिकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी, सिव्हील पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सचिनच्या मृतदेह खाली उतरवून घेत पोलिसांनी पंचनामा केला यानंतर रात्री उशिरापर्यंत सरक ारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली जात होती. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने दिलेल्या नातेवाइकांच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संपर्क साधला जात होता; मात्र कुठल्याहीप्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.