शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

मनोरुग्ण कक्षातून रुग्णाने घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:47 AM

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मनोरुग्ण कक्षाच्या खिडकीतून तरुण मनोरुग्णाने उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मनोरुग्ण कक्षाच्या खिडकीतून तरुण मनोरुग्णाने उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  याबाबत रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षात सुनील रामदास शिंदे (२७, रा. देवळाली गाव) यास चार दिवसांपूर्वी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सुनील याने रविवारी (दि.३) रात्री उशिरा त्याच्या वडिलांच्या हाताला हिसका देऊन मनोरुग्ण कक्षाचे स्वच्छतागृह गाठले. त्यानंतर स्वच्छतागृहाच्या खिडकीची झडप बाजूला करून त्याने खिडकीतून बाहेर उडी घेतली. यामुळे सुनील गंभीर जखमी झाला. त्याच्या हातापायांसह शरीराला जबर मार लागल्याने अतिदक्षता विभागात उपचारार्थ तत्काळ दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.  रुग्णालयांमधून उडी घेऊन जीवनयात्रा संपविण्याच्या घटना सुरूच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातून अशाच प्रकारे मूत्रपिंड विकाराने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांनी महिनाभराच्या अंतरात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील अशाच प्रकारे दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती झाली.सुनील याच्यावर मनोरुग्ण कक्षात उपचार सुरू होते. त्याच्यासोबत त्याचे वडील रामदास शिंदे हेदेखील दिवस-रात्र थांबून होते. मात्र रविवारी रात्रीच्या सुमारास सुनीलने त्यांच्या हाताला हिसका देत खिडकीतून बाहेर उडी मारली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोन महिन्यांमध्ये ही तिसरी घटना घडली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर