‘त्या’ प्रियकराला अखेर अटक; नातीनंतर आजीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:37 PM2018-08-07T14:37:54+5:302018-08-07T20:18:37+5:30

मंगळवारी (दि.७) उपचारादरम्यान तीची आजी पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. या दुर्दैवी घटने आजी-नाती चा मृत्यू झाला असून पिडित महिलेची मुलगी प्रितीदेखील गंभीर आहे.

Pathak Mathura in search of 'that' lover; After Lekki, the death of the mother | ‘त्या’ प्रियकराला अखेर अटक; नातीनंतर आजीचाही मृत्यू

‘त्या’ प्रियकराला अखेर अटक; नातीनंतर आजीचाही मृत्यू

Next
ठळक मुद्दे प्रेयसीसह तिची मुलगी व ९ महिन्यांच्या नातीला जिवंत पेटवून देत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले

नाशिक : अनैतिक संबंधाच्या वादातून परप्रांतीय प्रियकराने प्रेयसीच्या घरी अर्थात माहेरी आलेल्या विवाहिता प्रीती शेंडगे (रा.कोणार्कनगर) व त्यांची कन्या अर्थात प्रेसयसीची नात सिध्दी रामेश्वर शेंडगे (वय,९) यांच्यासह ४०वर्षीय प्रेयसीवर रॉकेल ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न नाशिकमधील पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरात झाल्याचे उघडकीस सोमवारी (दि.६) आले. या घटनेत मंगळवारी बालिका सिध्दीचा मृत्यू झाला तर मंगळवारी (दि.७) उपचारादरम्यान तीची आजी पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. या दुर्दैवी घटने आजी-नाती चा मृत्यू झाला असून पिडित महिलेची मुलगी प्रितीदेखील गंभीर आहे. संशयित परप्रांतीय आरोपी जलालुद्दीन खान (रा. उत्तरप्रदेश, अलीगढ) याच्या शोधात पथक रवाना झाले होते. संध्याकाळी अलीगढमध्ये त्याच्या मुसक्या आवळण्यात पंचवटी पोलिसांना यश आले.
काल सोमवारी (दि.६) दिंडोरीरोडवरील मायको दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या कालिकानगरला खान याने ४० वर्षीय प्रेयसी तिची २० वर्षीय मुलगी व एक ९ महिन्यांची बालिका अशा तिघींनाही भरझोपेत असतांना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत सिद्धी रामेश्वर शेंडगे (९ महिने) हिचा होरपळून मृत्यू झाला होता. 
फुलेनगर परिसरात राहणा-या प्रेयसीने काही दिवसांपुर्वीच कालिकानगरला खोली घेतली होती तर तिचा प्रियकर खान हादेखील बरोबर राहत होता. तीन ते चार दिवसांपुर्वीच त्या महिलेची कोणार्कनगर परिसरात राहणारी २० वर्षीय मुलगी  व ९ महिन्यांची नात आलेली होती. वर्षभरापासून अनैतिक संबंध जुळलेल्या त्या प्रेयसी व संशयित खान यांच्यात अनैतिक संबंधातून गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होते. शनिवारच्या दिवशी या दोघात वाद झाल्याने संताप अनावर झालेल्या खान याने रविवारी पहाटेच्या सुमाराला घरात झोपलेल्या प्रेयसीसह तिची मुलगी व ९ महिन्यांच्या नातीला जिवंत पेटवून देत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने ९ महिन्यांच्या सिद्धीचा होरपळून मृत्यू झाला होता तर पिडित व तिची मुलगी या दोघीही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले केले होते. या घटनेनंतर खान पसार झाला होता पोलीसांनी त्याच्या शोधासाठी पथक तयार केले करुन उत्तरप्रदेशला रवाना केले होते.. सुमारे ७० ते ८० टक्के भाजल्याने दोघी मायलेकी गंभीर जखमी असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्या, पिडित प्रेयसीचा मृत्यू मंगळवारी झाला आणि तिची मुलगी प्रितीही गंभीर आहे.

Web Title: Pathak Mathura in search of 'that' lover; After Lekki, the death of the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.