Passenger train canceled for five days | पॅसेंजर गाडी पाच दिवस रद्द
पॅसेंजर गाडी पाच दिवस रद्द

नाशिकरोड : मुंबई विभागात सुरू असलेल्या कामांमुळे इगतपुरी-मनमाड पॅसेंजर एक्स्प्रेस ही गाडी येत्या २० तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मनमाड-इगतपुरी पॅसेंजर ही काही दिवस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई विभागात तांत्रिक कार्य सुरू असल्याने गाडी क्र मांक ५१४२४ अप मनमाड-इगतपुरी तसेच इगतपुरी-मनमाड (डाउन) पॅसेंजर ही गाडी २० तारखेपर्यंत थांबविण्यात आली आहे. गाडी रद्द करण्यात आल्याने नाशिककरांसह मनमाड ते इगतपुरी दरम्यानच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकरोडमार्गे न जाता मनमाड-दौंडमार्गे जात असून, सदर गाडी डिसेंबरअखेरपर्यंत याच मार्गाने धावणार आहे.

Web Title: Passenger train canceled for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.