मुंबईतील आंदोलनात मालेगावच्या शिक्षकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 19:02 IST2021-01-31T19:02:04+5:302021-01-31T19:02:38+5:30
मालेगाव : मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन सुरू असून आंदोलनात शहरातील विविध शाळांचे शिक्षक सहभागी झाले आहेत.

मुंबईतील आंदोलनात मालेगावच्या शिक्षकांचा सहभाग
ठळक मुद्देविविध शाळांचे शिक्षक सहभागी झाले आहेत.
मालेगाव : मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन सुरू असून आंदोलनात शहरातील विविध शाळांचे शिक्षक सहभागी झाले आहेत.
राज्याच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक १ हजार ६२८ शाळांमधून २ हजार ४५२ तुकड्या २० टक्के अनुदान घेत आहेत. अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांचा निधी वितरणाचा आदेश तातडीने काढावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात मालेगाव हायस्कूलचे तस्लीम आरीफ शेख, कासीफ अन्सारी, फुरकान अन्सारी, कौसेन कादरी, सलमान अन्सारी, टीएम हायस्कूलचे रफिक शेख, स्वीस हायस्कूलचे दिलदार शेख हे शिक्षक सहभागी झाले आहेत.